महाराष्ट्र ग्रामीण

आशा व गटप्रवर्तक महिलांचे खासदार धनंजय महाडिकांना निवेदन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील आशा संघटना व गटप्रवर्तक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेले केंद्र सरकारकडील मानधन तत्काळ मिळण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात त्यांनी महाडिक यांना निवेदन दिले.

खासदार महाडिक यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी मंत्री जाधव यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन दोन दिवसांत मानधनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.


यासोबतच, आशा व गटप्रवर्तक महिलांनी त्यांच्या इतरही अनेक समस्या मांडल्या. खासदार महाडिक यांनी या सर्व विषयांसंदर्भात दिल्ली येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी बैठक घेऊन हे विषय सभागृहात मांडून या महिलांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.
ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांमध्ये या महिलांचे योगदान अनमोल आहे. कोणतीही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास त्या प्रामाणिकपणे व अचूकपणे कर्तव्य बजावतात. त्यांच्या या कार्याचा गौरव करत खासदार महाडिक यांनी उपस्थित सर्व महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना राज्य नेत्रदिपा पाटील, मंदाकिनी कोडक, शबाना पाटणकर, पद्मा दुरुगले, राधिका घाटगे, संध्या जाधव, राणी खोत, अनिता रावण, सुनीता पाटील, विद्या जाधव, रूपाली गुरव, राणी माने, अनुराधा अंगठेकर आणि सुजाता पाटील, स्वाती पाटील या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button