किल्ले शिवगड येथे नुकतीच एक दिवसीय पदभ्रमंती मोहीम

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) द्वारे राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्याजवळील किल्ले शिवगड येथे नुकतीच एक दिवसीय पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेत युवा कार्यकर्त्यांसह माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सहभाग घेतला.
यावेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांनी किल्ल्याचा समृद्ध इतिहास आणि आजूबाजूच्या परिसराविषयी सविस्तर माहिती दिली, ज्यामुळे सहभागींना ऐतिहासिक वारशाची अधिक चांगल्या प्रकारे जाणीव झाली.
पावसाळी वातावरणात दाजीपूर परिसरातील निसर्गरम्य शिवगडावरची ही पदभ्रमंती मोहीम एक अविस्मरणीय अनुभव ठरली. गेल्या वर्षीच्या किल्ले रांगणा येथील पदभ्रमंती मोहिमेची आठवण या निमित्ताने ताजी झाली, असे अनेक सहभागींनी सांगितले.
या पदभ्रमंती मोहिमेचे संयोजन अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, स्वराज भाट, निपुण चौगुले, अथर्व चौगुले, प्रणव पाटील, रोहित गाडीवडर, यश शिर्के, उदित नांद्रे, प्रथमेश पाटील या युवा कार्यकर्त्यांनी केले होते. त्यांच्यासोबत इतरही अनेक युवा कार्यकर्ते या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले होते. या मोहिमेमुळे युवा कार्यकर्त्यांना इतिहास आणि निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळाली