मनपा च्या दुर्लक्षामुळे लिशा हॉटेल रोड भागातील गटारीचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण!

प्रतिनिधी (कोल्हापूर) : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे लिशा हॉटेल रोड येथील यशवंत नगर आणि पल्स हॉस्पिटल ते ग्रीन पार्क अपार्टमेंट या भागातील गटारीचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिले होते. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाण, कोल्हापूर यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला, परंतु अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. मात्र, नव्याने आलेल्या उपशहर अभियंता निवास पोवार यांनी तातडीने संविधान सन्मान युवा प्रतिष्ठाण, कोल्हापूर यांच्या निवेदनाची दाखल घेत या समस्येला प्रतिसाद देऊन जागेवर येऊन पाहणी केली. तसेच त्यांनी आश्वासन दिले की, लवकरच हे काम पूर्ण होईल आणि आवश्यक त्या सर्व गोष्टी महानगरपालिकेकडून पुरविल्या जातील. या भेटीदरम्यान कनिष्ठ अभियंता उमेश बागुल आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे स्थानिकांना आता या समस्येच्या निराकरणाची आशा आहे.