कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती बैठक: लोककल्याणकारी योजनांना गती देण्याचा निर्धार!

कोल्हापूर (सलीम शेख ) : जिल्ह्याच्या विकासाला आणि लोककल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ होत्या.
बैठकीत शालेय शिक्षण, आरोग्य, सौरऊर्जा, पूर नियोजन, रोजगार हमी योजना, वनहक्क, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न अशा अनेक लोकहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७६४.६२ कोटी रुपयांच्या निधीतून राबवायच्या कामांचा आराखडा यावेळी निश्चित करण्यात आला.
शिक्षण, आरोग्य, सौरऊर्जा आणि सार्वजनिक हिताच्या योजनांना प्राधान्य देण्याचे मार्गदर्शन या बैठकीतून करण्यात आले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा योग्य वापर करून जनसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर देण्याबाबत चर्चा झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत असगावकर, आमदार अरुण लाड, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त संजय मरकळे, प्रभारी अधिकारी अमित सुतार, सहा. अधिकारी सागर पाटील तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल.