शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी!

कोल्हापूरः (सुभाष भोसले): मुक्त सैनिक वसाहत येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल येथे लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांची १५१ वी जयंती विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. राजर्षी छ. शाहू महाराजांच्या प्रतिमेस प्रमुख वक्ते अनिल चव्हाण यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही.व्ही. कुलकर्णी होत्या. यावेळी गीतमंचच्या मुलींनी शाहू गौरव गीत सादर केले. यावेळी भागातून प्रभात फेरी व भित्तीपत्रक प्रकाशन करण्यात आले. यावेळी इयत्ता १०वी च्या वैदही, सई, उर्मिला, अखिलेश्वरी व स्नेहल या मुलींची भाषणे झाली. राजर्षी शाहू जीवन ग्रंथाचे वाचन मुख्याध्यापिका व्ही.व्ही. कुलकर्णी मॅडम यांनी केले. प्रमुख वक्ते अनिल चव्हाण यांनी आपल्या भाषणातून राजर्षी छ. शाहू महाराजांचा जीवनपट मांडला. राजर्षी शाहू महाराज हे अनेक कलांना राजाश्रय देणारे लोक कल्याणकारी राजे होते. त्यांचे विचार मुलांनी आत्मसात करावेत असा संदेश दिला. सूत्रसंचालन अनुष्का चव्हाण व आभार अनुष्का निगवेकर हिने मानले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. पी. मोरे, दहावी ब वर्गशिक्षक पी. आर. भोसले, जिमखाना प्रमुख समीर जमादार व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.