कोल्हापूर येथे पेठ वडगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे खासदार धैर्यशील माने आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पेठ वडगाव येथील प्रलंबित असलेल्या रुग्णालयाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. अशोकराव माने यांनी पेठ वडगाव येथील क्रीडा संकुलाजवळच्या जागेत लवकरात लवकर १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, अशी मागणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, मोहनलाल माळी, विजयसिंह माने, भैय्या, अमरसिंह पाटील, तय्यब कुरेशी, धनंजय टारे, रंगराव बावडेकर, अजय थोरात, संतोष ताईगडे, अक्षय मदने, संतोष चव्हाण, सागर भोसले, राजकुमार मिठारी, विकास कांबळे, धनंजय गोंदकर, राजेंद्र जाधव, अमर पाटील, शरद पाटील, सुकुमार पाटील, विजय शहा, दिनेश सनगर, सुकुमार देसाई, सुप्रिया पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे पेठ वडगाव येथील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली असून, लवकरच या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. हे रुग्णालय परिसरातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.