मुरगुड पिंपळगावात भीषण अपघात, एक ठार सहा जखमी!

मुरगुड (सलीम शेख) : पिंपळगाव दिनांक २५ जून २५ कागल-निढोरी रस्त्यावर पिंपळगाव बुद्रुक येथे पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. एरटिका गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मुरगुड पोलिसांनी रामचंद्र अशोक शिंदे (वय ३५, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आण्णासो सुखदेव शिंदे (वय ३०, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी रामचंद्र अशोक शिंदे हा त्याच्या ताब्यातील एमएच-१२-एनपी-९४२४ या क्रमांकाची एरटिका गाडी भरधाव वेगाने कागल ते निढोरी रस्त्यावरून चालवत होता. यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पुढील तपास मुरगुड पोलीस करत आहेत.