लाखो शर्यत शौकिनांनी अनुभवला ‘सतेज केसरी’ बैलगाडी शर्यतीचा थरार!

नेर्ली (सलीम शेख) : बेंदूर सणाच्या निमित्ताने करवीर तालुक्यातील नेर्ली या गावी नेर्ली माळ येथे कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकिन मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सतेज ‘व ‘ऋतु केसरी’ भव्य बैलगाडी शर्यतींनी लाखो शर्यत शौकिनांना मंत्रमुग्ध केले. माजी आमदार ऋतुराज संजय पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या थरारक शर्यतींनी कृषी संस्कृतीचा एक अविस्मरणीय सोहळा सादर केला.
नियम पाळून जल्लोषी आयोजन
शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे सुरक्षिततेसोबतच शर्यतीचा थरार अनुभवताना उपस्थितांचा उत्साह गगनाला भिडला होता. या आयोजनात नारायण गाडगीळ, सागर पाटील आणि गजानन पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच संग्राम पाटील, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेवाडीचे सरपंच सुदर्शन खोत, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, माजी सरपंच शशिकांत खवरे, नेर्लीचे उपसरपंच निखिल पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक आर. एस. कांबळे यांच्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो शर्यत शौकीन उपस्थित होते. या मोठ्या संख्येने उपस्थितीने शर्यतींना एक वेगळाच रंग चढला होता.
बेंदूर सणाच्या उत्साहात पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतींनी ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवत उपस्थितांना एक संस्मरणीय अनुभव दिला.
सतेज ऋतू केसरी मैदान
1 लाखाचे नेलीं माळ मैदान
जनरल अ गट निकाल
महाराष्ट्र शर्यत चॅनेल
प्रथम क्रमांक :- १,००,०००/-
मालक – युवराज शिंदे कोल्हापूर / बैल – सरपंच राजा
मालक – संभाजी गाडगीळ पाचगाव / बैल – RX बैज्या
गाडीवान – हिंदकेसरी राव दादा पांडेगाव
व्दितीय क्रमांक :- ७५,०००/-
मालक – महेश बोंद्रे सरकार / बैल – बुलेट छब्या
मालक – शिवाजी मेटकरी / बैल – सांगोला राजा
गाडीवान – हिंदकेसरी बंडा भाऊ खिल्लारे
तृतीय क्रमांक :- ५०,०००/-
मालक – पाटील डेअरी भिलवडी / बैल – फुल्या
मालक – अमोल घागरे ढालगाव / बैल – कॅडबरी
गाडीवान – बापू खोत सिद्धेवाडी
चतुर्थ क्रमांक :- २५,००० /-
मालक – पाटील डेअरी भिलवडी / बैल – ब्रेक फेल बैज्या
मालक – धोंडीबा गाडगीळ / बैल – चिमण्या
गाडीवान – हिंदकेसरी ग्यास्कु दानोली