निराधार , बेघर , बेवारस , अनाथ लोकांमध्ये वाढदिवस साजरा – नेर्लीच्या ढाले कुटुंबाची सामाजिक बांधिलकी!

नेर्ली (सलीम शेख) : नेर्ली येथील पत्रकार व महाराष्ट्र राज्य जनहित पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा सचिव रिपाइंचे कोल्हापूर जिल्हा संघटक आयु उत्तम कांबळे फौंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र ढाले यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा ढाले यांचा वाढदिवस समाजातील निराधार बेघर आणि बेवारस वाणरमारी वसाहत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप यासारख्या सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला.
मत्तीवडे येथील देवांश मनुष्य समाज सेवा निराधारांचा आधार वृद्धाश्रम आणि अनाथ या ठिकाणी गेली अनेक वर्षे असे निस्वार्थीपणे उपक्रम राबविले जातात.आश्रमातील ४५ लोकांमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी आश्रमातील सर्व लोकांना ढाले परिवाराकडून अन्नदान करण्यात आले होती , यावेळी सर्व ढाले परिवार आणि उपस्थित मित्रपरिवार यांनी या ४५ लोकांना अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली घरातील कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस ढाले परिवार हे अनाथाश्रम. , वृद्धाश्रम , मूकबधीर , मतिमंद विद्यालय अश्या लोकांमध्ये साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसतात.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमर पवार अध्यक्षा शुभांगी पोवार यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार पत्र ढाले परिवारास दिले
या कार्यक्रमास पत्रकार राहुल मिस्त्री,विक्रम ढाले, बाळासाहेब कांबळे, पत्रकार प्रशांत दळवी राजेंद्र ढाले, त्यांच्या पत्नी सुरेखा ढाले , साक्षी ढाले , प्राजक्ता ढाले , संदेश शिंदे , प्रियांका शिंदे उपस्थित होते