नेर्लीतील तुटलेल्या नळ व्हॉल्व्हची दुरुस्ती; ‘कोल्हापूर टाइम्स ‘च्या बातमीची दखल!

कोल्हापूर (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील नेर्ली गावात काही दिवसांपूर्वी नळ व्हॉल्व्ह तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याची आणि गल्लीतील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची समस्या ‘कोल्हापूर टाइम्स’ या स्थानिक वृत्तपत्रातून समोर आणली होती. रस्त्याचे काम सुरू असताना हा व्हॉल्व्ह तुटल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
‘कोल्हापूर टाइम्स ने या समस्येवर प्रकाश टाकल्यानंतर, नेर्लीचे सरपंच अंकुश धनगर आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ या बातमीची दखल घेतली. युद्धपातळीवर काम करून, तुटलेल्या नळ व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.
या त्वरित कार्यवाहीबद्दल नेर्ली गावातील नागरिकांनी ‘कोल्हापूर टाइम्स’ वृत्तपत्राचे सर्व स्तरातून कौतुक व आभार मानले आहेत. वृत्तसेवा जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडल्यामुळेच ही समस्या मार्गी लागली, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.