महाराष्ट्र ग्रामीण
शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडून शाहू जन्मस्थळी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : दौऱ्यावर आलेल्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी आज कोल्हापुरात लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
पवार साहेब यांनी प्रथम कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाला भेट देऊन लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजीव आवळे, समरजीतसिंह घाटगे, व्ही.बी. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, अनिल घाटगे, श्रीराम सेवा सोसायटीचे सर्व संचालक आदी उपस्थित होते.