महाराष्ट्र ग्रामीण

पट्टणकोडोली येथील धोकादायक डीपी स्थलांतरासाठी युवासेनेचा महावितरणला अखेरचा इशारा!

पट्टणकोडोली (सलीम शेख ) : सवळ गल्लीतील नागनाथ मंदिर, दर्गा आणि अंगणवाडीच्या अगदी शेजारी असलेली महावितरणची एक जुनी आणि अत्यंत धोकादायक डीपी (वितरण यंत्रणा) तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, या मागणीसाठी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी दादा जाधव आणि उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. या डीपीमुळे लहान मुले खेळत असताना किंवा नागरिक ये-जा करत असताना अपघाताची शक्यता नेहमीच असते, असे निवेदनात म्हटले आहे.


या गंभीर समस्येबाबत यापूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत आणि महावितरणला तक्रारी व सूचना देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन डीपी त्वरित तिच्या जुन्या किंवा सुरक्षित ठिकाणी हलवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा, नाईलाजास्तव शिवसेना युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या मागणीचे निवेदन हुपरी येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कुलकर्णी तसेच पट्टणकोडोली येथील महावितरण कार्यालयातील ओमकार काळे यांना देण्यात आले.
यावेळी ओमकार तोडकर, रोहन माळी, अमोल तोडकर, आदित्य चव्हाण, अनिकेत तोडकर, कुमार कोळी, ऋषिकेश तोडकर, उमेश पाटील, करण तोडकर, सावंत पुजारी, आदित्य नेरले, पृथ्वीराज जाधव, निखिल जाधव, करण जाधव, आदेश माळी, सौरभ चौगुले, तानाजी कागले, संतोष मगदूम, तुषार घाडगे, दिग्विजय तोडकर, सुशांत पाटील, सुधीर तोडकर, सुरज गावडे, सचिन गावडे, रोहित तोडकर, प्रथमेश मोरे, रणजीत तोडकर, देवदास तोडकर, दशरथ तोडकर, विनायक तोडकर, आदींसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. महावितरण या गंभीर प्रश्नी कधी पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button