राधानगरीच्या जंगलात गवा रेड्यांची झुंज व्हायरल!

कोल्हापूर (सलीम शेख ) : ‘जंगलाचा झुंज राजा’ म्हणून ओळखला जाणारा गवा रेडा एकमेकांशी झुंजतानाचा एक चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘राधानगरी नॅचरल’ या पेजवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, निसर्गप्रेमींकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राधानगरी अभयारण्याच्या घनदाट जंगलात दोन बलवान गवे एकमेकांशी झुंज देत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यांची ताकद आणि झुंजण्याची पद्धत पाहून कुणीही थक्क होईल. एका निसर्गप्रेमीने हा अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, ज्यामुळे वन्यजीवनाचे एक अद्भुत आणि दुर्मिळ दृश्य आता सर्वांना पाहता येत आहे.
गवा रेडा हा अतिशय शक्तिशाली आणि देखणा प्राणी आहे. जंगलात त्यांची झुंज पाहणे हा एक रोमांचक अनुभव असतो. या व्हिडिओमुळे राधानगरीच्या समृद्ध जैवविविधतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.