शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं कोल्हापुरात धरणे आंदोलन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशाप्पा, युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, युवा शहर प्रमुख संजय पोळ, मीडिया प्रमुख मनोहर सातपुते, तसेच सागर टेबुगडे, सुहास, संदीप हजारे, गायकवाड, बाजीराव पाटील, चिंतन माछरे, विश्वनाथ झेंडे, अक्षय शिंदे आणि जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने त्वरित सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.