Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीण

तामगाव (करवीर) येथे श्री शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा!

तामगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील तामगाव येथे डीएमआर फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्राच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला श्री शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवमूर्तीस महाभिषेक डीएमआर फाउंडेशनचे संस्थापक रणजित दुर्गुळे, अध्यक्ष मीनाक्षी दुर्गुळे आणि सर्व शिवभक्तांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला फाउंडेशनचे महिला संचालक मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.


याप्रसंगी प्रतिभाताई तावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, हिंदू संस्कृती आणि धर्माबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे होत्या, तर उपाध्यक्ष संगीता पाटील, सेक्रेटरी मालती सावंत आणि खजिनदार वर्षा सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रमुख पाहुण्यांना झाडे, शाल, श्रीफळ आणि स्वामी समर्थांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व महिला संचालक मंडळ, कार्याध्यक्ष अनिल खामकर, युवराज देसाई, ओंकार शिंदे, अजय बुध्याहळ, ज्ञानेश्वर खोत, अजय देसाई, संदेश दिवेकर, राहुल सुर्वे आणि गावातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवराज देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर कार्याध्यक्ष अनिल खामकर यांच्या समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button