महाराष्ट्र ग्रामीण

नागरिकांना दिलासा: नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्ता दुचाकींसाठी खुला!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जनआंदोलनाला अखेर यश मिळाले असून, नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडी दरम्यानचा विमानतळ प्रशासनाने बंद केलेला रस्ता दुचाकी आणि कमी क्षमतेच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नेर्ली, तामगाव, हालसवडे आणि उजळाईवाडी येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.


विमानतळ प्रशासनाने हा रस्ता बंद केल्याने परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. यामुळे दैनंदिन व्यवहार आणि प्रवासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या विरोधात ग्रामस्थांनी एकवटून दीड महिन्यांपासून जनआंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा मिळाला, ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला.


या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ प्रशासनाने पर्यायी मार्ग तयार होईपर्यंत हा रस्ता दुचाकी व कमी क्षमतेच्या वाहनांसाठी खुला करण्यास सहमती दर्शवली. जिल्हाधिकाऱ्यांनीही यावर सकारात्मकता दाखवल्याने रस्ता खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला.


अजूनही काही अडचणी कायम
रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी, उजळाईवाडी बाजूला दुचाकी चालकांना अजूनही कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. एका बाजूने रस्ता खुला झाला असला तरी, दुसऱ्या बाजूला वाहन चालवण्यासाठी अडचणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पूर्णपणे सुलभ वाहतुकीसाठी अजूनही काही सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मिळालेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी उर्वरित अडचणीही लवकरच दूर होतील अशी अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button