उजळाईवाडीच्या महालक्ष्मीनगरात ‘ऑक्सिजन पार्क’ रहिवाशांनी लावली सातशे झाडे; रस्त्याच्या दुतर्फा सावली!

उजळाईवाडी (सलीम शेख) : उजळाईवाडी, ता. करवीर
येथील महालक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी वृक्ष लागवड करत ऑक्सिजन पार्क बनवले आहे. प्रत्येक बंगल्याच्या दारात एक झाड आणि कॉलनीत प्रत्येकाने दुतर्फा पाच अशी जवळजवळ सातशे झाडे लावून पर्यावरणाला हातभार लावत ती जगवली आहेत. गेल्या ७ ते १० वर्षांत वृक्षांनी कॉलनीचा परिसर
उजळाईवाडीः महालक्ष्मीनगर येथील रहिवाशांनी कॉलनीत दुतर्फा वृक्षारोपण करून ऑक्सिजन पार्क उभा केला आहे. हिरवागार झाला आहे.
कॉलनीत आजअखेर सातशे झाडे लावली आहेत. आंबा, फणस, चिकू, जांभळ, पेरू, आवळा, नारळ, काजू, केळी, फणस यासह मसाले, फुलांची झाडे लावली आहेत.
प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे येथे टुमदार झाडांनी हिरवाई पसरली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते तलहा मणेर, प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह कॉलनीतील प्रत्येक सदस्याने पुढाकार घेतला आहे.