आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार’ द्वितीय क्रमांकाचा सन्मान रेश्मा कांबळे यांना!

धुंदवडे (विलास पाटील ): जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे सन २०२३-२०२४ साठी दिला जाणारा ‘आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार’ रेश्मा महादेव कांबळे यांना द्वितीय क्रमांकाचा प्राप्त झाला आहे.
रेश्मा कांबळे या गगनबावडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मांडूकली येथील अंगणवाडी क्रमांक ११३ मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सेवाभाव, बालकांच्या पोषण व आरोग्य क्षेत्रातील कामगिरी आणि अंगणवाडी व्यवस्थापनातील सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामुळे अंगणवाडी सेविकांच्या कार्याची सार्वजनिक पातळीवर दखल घेतली जात असून, प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सेविकांना प्रोत्साहन मिळत आहे.
रेश्मा कांबळे यांचे ग्रामस्थ, पालक वर्ग आणि सहकारी कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे