तामगांव च्या DMR फॉउंडेशन चा कौतुकास्पद उपक्रम;आषाढी वारी निमित्त उपासाचे पदार्थ व पाणी बॉटल वाटप!

प्रतिनिधी: तामगांव च्या DMR फॉउंडेशन चा कौतुकास्पद उपक्रम DMR फॉउंडेशन ट्रस्ट संचलित श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्र तामगांव यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त उपासाचे पदार्थ व पाणी बॉटल वाटप करण्यात आले या वेळी दर्शन बारीत व दिंडीतील सर्व भक्तांना फराळा चे सर्व साहित्य वाटप करण्यात आले या साठी फॉउंडेशन चे संस्थापक रणजित दुर्गुळे, अध्यक्ष मीनाक्षी दुर्गुळे, उपाध्यक्ष संगीता पाटील सेक्रेटरी मालती सावंत खजानीस वर्षा सुर्वे व सर्व महिला संचालक व सर्व सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रम ठिकाणी संस्थापक रणजित दुर्गुळे, कार्याध्यक्ष अनिल खामकर, खाजानीस युवराज देसाई, संदेश दिवेकर, अजय देसाई साईराज दुर्गुळे उपस्थितीत होते या साठी श्री स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्र व अध्यक्ष मीनाक्षी दुर्गुळे, श्री बाळू मामा बेकरी तामगांव सचिन नुलके आणि सौ रेखा रघुनाथ नरुटे, जितेश तटकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्याध्यक्ष अनिल खामकर यांनी सार्वचे आभार मानले.