65 वर्षीय व्यक्तीची चोकाक येथे आत्महत्या!

हातकणंगले (सलीम शेख): हातकणंगले तालुक्यातील चोकाक गावात रविवारी (दि. १३ जुलै) सकाळी एका ६५ वर्षीय व्यक्तीने दुकानाच्या गाळ्यातील बेसमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोहर गणपती सुतार (वय ६५, रा. कबनूर, ता. हातकणंगले) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी सकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या सुमारास चोकाक येथील पाहुणे सुरेश लोहार यांच्या दुकान गाळ्याच्या बेसमेंटमधील खिडकीस दोरी बांधून गळफास घेतला.
या घटनेची माहिती मृताचे पुत्र सचिन मनोहर सुतार (वय ३९) यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनेची नोंद केली.
या प्रकरणाचा पुढील प्राथमिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पाटील करत असून, पोलिस उपनिरीक्षक विनोद पिलाने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.