महाराष्ट्र ग्रामीण
शिष्यवृत्ती परीक्षेत धुंदवडे शाळेची यशाची पारंपरा कायम!

धुंदवडे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात विद्या मंदिर धुंदवडे शाळेच्या विद्यार्थिनीं वेदिका सागर पाटील(५वी), योगिता भगवंत पाटील, श्रद्धा सागर सुतार(८वी) यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत यश संपादन केले. या शिष्यवृत्ती परीक्षेतील शाळेच्या यशाची परंपरा कायम राखल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थिनींना नवनाथ लिंगायत, संभाजी कांबळे ,सागर पाटील यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक व्ही.बी.चौगले, शिक्षक वृंद ,शालेय व्यवस्थापन समितीचे व ग्रामस्थांची प्रेरणा मिळाली.