गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुपौर्णिमा पावन पाद्यपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न!

गडहिंग्लज (सलीम शेख ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त गडहिंग्लज शहरात पावन पाद्यपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, जो अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
या प्रसंगी महंत सिद्धेश्वर स्वामी (बेलबाग, गडहिंग्लज), गुरू सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (सुरगिश्वर मठ, नूल) आणि ष. ब्र. नंजुंड पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी (हेरूर) यांचे पाद्यपूजन करण्यात आले.
यावेळी गुरूंना वंदन करत, “गुरुचरणी नतमस्तक होणे म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात आहे. समाजाच्या मार्गदर्शनासाठी संतांचा आशीर्वाद अनमोल आहे,” असे भावपूर्ण उद्गार काढण्यात आले.
या भक्तिमय सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, माजी नगराध्यक्ष किरणआण्णा कदम, गडहिंग्लज साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, गुंडेराव पाटील, सिद्धार्थ बन्ने, हरून सय्यद, सुरेश कोळकी, राहुल शिरकोळे, करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील, अमर मांगले, शर्मिली पोतदार, शीलाताई जाधव, शारदा आजरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.