महाराष्ट्र ग्रामीण

धामणीवासियांचे स्वप्न झाले साकार :दीड टीएमसी पाणीसाठा पूर्ण .धरण शंभर टक्के भरले.!

धुंदवडे (विलास पाटील) : धामणी मध्यम प्रकल्पाच्या रखडलेल्या प्रवास अखेर संपला आहे . सध्या प्रकल्पात दीड टीएमसीहून अधिक पाणी साठवले गेले आहे. पाटबंधारे विभागाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे आणि जनतेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे धामणी खोऱ्यात हरितक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात सकार झाले आहे . शनिवार दि. ५ जुलै रोजी सकाळी ११वाजता सांडव्यावरून (वळण कलव्यामधून ) विसर्ग सुरू झाला आहे .पाणी पातळी ६१७.०५० मी आहे .आजचा पाणी साठा ३५.६० दल घमी (१.२९ टी एम सी ) इतका आहे .व धामणी प्रकल्पचा एकूण पाणी साठा १०९.०३४ दल घमी (३.८५ टी एम सी)इतका आहे सन २०२५-२६ मध्ये करावयाचा पाणी साठा ३६.६० दल घमी (१.२९ टी एम सी) इतका करायचा आहे. सध्या धामणी मध्यम प्रकल्पातून सिंचन विमोचक विसर्ग १६१७.३९ क्युसेक्स होत आहे .तसेच वळण कलव्यामधून ३३५.५५क्युसेक्स विसर्ग सुरू आहे व एकूण विसर्ग १९५२.९४ क्यूसेक्स इतका आहे हा विसर्ग धामणी नदीपात्रात सुरु आहे त्यामुळे धामणी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होणार आहे. तरी नादिकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा इशारा देण्यात आला आहे.


पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रकल्पात भरभरून पाणीसाठा झाल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली २४ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता.जनआंदोलने, मोर्चा, उपोषणांचा धडका,गतवर्षी आमरण उपोषणाचा इशारा या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे धामणी प्रकल्प चर्चेत राहिला. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ३.८५ टीएमसी आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर यावर्षी प्रथमच दीड टीएमसी पाणीसाठा करून ठेवण्यात यश आले आहे. गतवर्षी ऑक्टोबरपासूनच घळभरणीचे काम सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार धामणीवासीयांनी व्यक्त केला होता. याची गंभीर दखल घेत पाटबंधारे विभागाने काटेकोर नियोजनाद्वारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.

या साठवलेल्या पाण्यामुळे धामणी खोऱ्यातील पिढ्यानपिढ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष तीन तालुक्यांतील सुमारे १४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. परिणामी शेती उत्पन्नात वाढ होणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील. तसेच
धामणी प्रकल्प हा केवळ पाण्याचा नव्हे, तर धामणीवासीयांच्या स्वप्नांचा आणि संघर्षांचा विजय आहे. यशाच्या या टप्प्यानंतर संपूर्ण प्रकल्पाचे लवकरात लवकर पूर्णत्व गाठणे हीच आता सर्वांची अपेक्षा आहे.

धामणी मध्यम प्रकल्पाच्या पूर्ततेतून राधानगरी ,गगनबावडा ,पन्हाळा तालुक्यातील चौदाशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतीला पाणीपुरवठा होणार आहे .त्याचबरोबर पर्यटनाच्या नव्या संधी, स्थानिक रोजगारात वाढ होऊन धामणी खोऱ्यातील विकासाची नवी दालने उघडणारा प्रकल्प ठरणार आहे.

संतोष पाटील: लोकनियुक्त सरपंच गारिवडे,  पांडुरंग पाटील समाजिक कार्यकर्ते धुंदवडे . धामणी मध्यम प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. आज रोजी दीड टीएमसी पाणीसाठा झाल्याने सर्व धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धामणी कृती समितीने सातत्याने केलेली जन आंदोलने, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा, तितकीच प्रकल्पग्रस्तांनी दिलेली साथ या साऱ्या गोष्टींच्या जोरावर धामणीवासियांचा पाण्यासाठीचा संघर्ष संपणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button