गोकुळ शिरगाव येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

गोकुळ शिरगाव, ता. करवीर (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आज आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच चंद्रकांत डावरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के. डी. पाटील सर यांच्यासह टी. के. पाटील (आण्णा), नायकवडे सर, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी, आदिनाथ पाटील, प्राचार्य तेजस पाटील, सतीश एरंडोले, प्रकाश तारदाळे, सुनील पाटील, विकास पाटील, वसंत डावरे, शामराव पाटील, विलास पाटील, जयसिंग पाटील, केसरकर मॅडम आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांची भाषाशैली व आत्मविश्वास वाढतो, असे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.