महाराष्ट्र ग्रामीण

इगळीत शिवसेनाचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अमरण उपोषणाचा इशारा!

इंगळी (सलीम शेख ) : सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर व हातकणंगले यांच्या कार्यक्षेत्रातील इंगळी गावातील अनेक सार्वजनिक कामे अपूर्ण राहिल्याने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) इंगळी शहरप्रमुख केशव नारायण पाटील व शिवसेना संघटनाने‌ पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या १२ ऑगस्ट २०२५ पासून इंगळी गाव पूर्णपणे बंद ठेवून हे आंदोलन छेडण्यात येणार असून, याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पाटील यांनी आपल्या निवेदनात अपूर्ण राहिलेल्या कामांचा तपशील दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे.

इंगळी गावातील ओढ्यावर पूल बांधणे.
इंगळी-चंदूर येथील अपूर्ण राहिलेला कॉंक्रिट रस्ता पूर्ण करणे.
चंदूर-इंगळी प्रस्तावित पुलासाठी लागणाऱ्या जमिनीचे १४ जून २०१९ च्या शासन आदेशानुसार भूसंपादन करून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे.
इंगळी-हुपरी येथील ओढ्याची संरक्षण भिंत व अपूर्ण असलेला रस्ता लवकरात लवकर बांधणे.
आश्वासनानंतरही कामांना सुरुवात नाही.


यापूर्वी, या सर्व कामांसाठी केशव पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी संतोष पाटील व प्रवीण मोरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन दिले होते की, सदर अपूर्ण कामे तीन ते चार महिन्यांत पूर्ण करण्यात येतील. या बैठकीस गावकरी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि हुपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
मात्र, गेल्या सात महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही कामाची पूर्तता किंवा सुरुवात झालेली नाही. त्यामुळे केशव पाटील यांनी पुन्हा स्मरणपत्र देऊन तात्काळ कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती, परंतु तरीही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या केशव पाटील आणि ग्रामस्थांनी आता १२ ऑगस्ट २०२५ पासून गाव पूर्ण बंद ठेवून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात केशव पाटील यांच्यासह अब्बास नाईकडे, जावेद नायकवडे, सुधीर भातमारे, शानुर नाईकवडे, विजय शिंदे, अप्पा अप्पा मोरे, अफजल नाईकवडे, साहेबजी नायकवडे, निजाम पटेल, वजीर नाईकवडे, आसिफ पटेल, तारामा नाईकवडे, मुमताज नाईकवडे, मौलाअली नायकवडे, अजित जमादार, रामा मिठारी, मधुकर भातमारे, शबाना नाईकवडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या गंभीर परिस्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेतो आणि ग्रामस्थांच्या मागण्या कधी पूर्ण होतात, हे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button