कणेरी ग्रामपंचायतीला वेताळमाळ येथील रस्ता समस्येबाबत निवेदन

कणेरी (सलीम शेख ) : तालुका करवीर मधील कणेरी गावातील वेताळमाळ येथील वाढीव गावठाण गट क्र. १४४०ब मधील नवीन वाढीव गावठाणातील प्लॉट क्र. १ ते ९१ मध्ये जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने, येथील रहिवाशांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना निवेदन सादर करत या समस्येवर तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
या वाढीव गावठाणामध्ये येण्यासाठी मार्ग नसल्यामुळे प्लॉटधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेताळमाळ येथील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन सादर करताना रेखा शिंदे, सतीश चिखलहाळे, विजय पाटील, आनंदा पाटील, संदीप चिखलव्हाळे, रमेश यादव, राजेंद्र पाटील, धनाजी पाटील, सुनील वडर, गणपती चिखलव्हाळे, रघुनाथ शामराव पाटील, सरिता संतोष पाटील, बाळाबाई पाटील, अमर आडनाईक, आक्काताई पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सर्व प्लॉटधारकांच्या वतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी या गंभीर समस्येची लवकरात लवकर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, जेणेकरून वेताळमाळ येथील रहिवाशांना सुलभ मार्ग उपलब्ध होईल.