महाराष्ट्र ग्रामीण
सेनापती कापशी येथील शाळेत नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर छेडछाडीचा प्रकार उघडकीस!

सेनापती कापशी (न्यूज नेटवर्क): कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी येथील एका शाळेत एका नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने शाळेतील एका विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.