महाराष्ट्र ग्रामीण
नवोदिता घाटगे यांचा कर्णबधिर विद्यार्थ्यांसोबत अनोखा वाढदिवस साजरा!

कागल (सलीम शेख ) : राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा आणि राजे विक्रमसिंहजी घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक लि. कागलच्या चेअरमन नवोदिता घाटगे यांचा वाढदिवस रविवार, २९ जून २०२५ रोजी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हिदायत नायकवडी यांच्या पुढाकाराने नविदिता घाटगे यांनी आपला वाढदिवस श्रीमंत दिलीपसिंह घाटगे कर्णबधिर विद्यालय, कागल येथील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
या प्रसंगी कर्णबधिर मुलांना स्नेहभोजन देण्यात आले. नवोदिता घाटगे यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते, श्री दूधगंगा डेअरीचे संचालक प्रमोद कदम, सचिन निंबाळकर, लखन गोसावी, सौरभ सोनुले, सतिश वड्ड, संजय पाडदे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.