गैबी चौकात युवा उद्योजक रणजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!

कागल (सलीम शेख): गैबी चौकात युवा उद्योजक रणजित महावीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आसिफ मुल्ला प्रेमी ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला श्रीमंत राजे समरजीतसिंहजी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच अनेक मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात सत्कारमूर्ती युवा उद्योजक रणजित महावीर पाटील यांच्या सत्काराने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आसिफभैय्या मुल्ला, मुख्याध्यापक वाळवेकर, ज्येष्ठ अध्यापिका संध्या कुलकर्णी मॅडम, गायकवाड सर, आणि कांबळे सर उपस्थित होते. तसेच राजे विक्रमसिंहजी घाटगे विचारमंच कार्याध्यक्ष शिवगोंडा पाटील आणि उद्योजक विशाल पाडळकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी आसिफ मुल्ला प्रेमी ग्रुपने रणजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व खाऊ वाटप तसेच अन्नधान्य वाटप यांसारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. उपस्थित मान्यवरांनी रणजित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यामुळे हा सोहळा अधिक उत्साहात पार पडला.