श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

कागल (सलीम शेख ) : श्री शाहू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथील सहाय्यक मोटर निरीक्षक तेजस डोळ यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सुरक्षित प्रवासासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. श्री. डोळ यांनी वाहतुकीचे नियम, चिन्हे आणि अपघातांपासून बचाव करण्याच्या उपायांबद्दल विस्तृत माहिती दिली.
याप्रसंगी नेताजी बुवा, बबन चौगुले, किरण परीट, संग्राम जाधव यांसह प्राचार्य टी. ए. पोवार, उपमुख्याध्यापक आर. एस. पाटील, पर्यवेक्षिका यु. सी. पाखरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. बी. शेडबाळे यांनी केले, तर एस. के. भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.