दूधगंगा डेअरी आणि उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत उर्फ प्रमोद कदम यांची निवड!

कागल (सलीम शेख ) : श्रीमंत राजे समरजीतसिंहजी घाटगे यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली उत्तुंग भरारी घेत असलेल्या दूधगंगा डेअरी संस्था आणि दूधगंगा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत उर्फ प्रमोद सुबराव कदम यांची निवड झाली आहे. प्रमोद कदम हे कागलमधील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांचा मनमिळाऊ आणि प्रतिष्ठित स्वभाव सर्वश्रुत आहे. त्यांच्या निवडीमुळे दूधगंगा परिवारात उत्साहाचे वातावरण आहे.
अध्यक्षपदी निवड होताच, नूतन अध्यक्ष प्रमोद कदम यांनी सर्वप्रथम उद्योग समूहाचे संस्थापक, दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
आसिफ मुल्ला प्रेमी ग्रुप आणि इतर सर्व हितचिंतकांच्या वतीने नूतन अध्यक्ष प्रमोद कदम यांचा नागरी सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मेट्रो हायटेकचे माजी अध्यक्ष भरत पाटील, राजे बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, असिफ मुल्ला, महादेव घाटगे, शिवगोंडा पाटील, विशाल पडळकर, रणजीत पाटील, संतोष आंबी, पिंटू कचरे, बाळासाहेब चौगुले, दीपक भोसले, शिवाजी रेडकर, वैद्य, बाळासो संकपाळ, डॉ. नरेंद्र घाटगे, बंडा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली दूधगंगा डेअरी संस्था आणि उद्योग समूह यशाची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.