राजे विरेंद्रसिंह घाटगे यांच्याकडून कागल येथील गैबी दर्गेचे व मोहरम पीर दर्शन : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक!

कागल (सलीम शेख ) : आज दिनांक ४जुलै सायंकाळी, घाटगे घराण्याचे राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी कागल येथील सुप्रसिद्ध गैबी दर्गा येथे मोहरमनिमित्त पारंपरिक भेट दिली. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांसाठी श्रद्धास्थान असलेल्या या दर्ग्यात त्यांनी गैबी पीर आणि इतर पीर दर्शनासाठी उपस्थिती लावली. ही भेट धार्मिक सलोखा आणि परंपरेचे प्रतीक ठरली.
राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी दर्ग्यातील मोहरम निमित्त सर्व पीर ची प्रार्थना केली, ज्यामुळे त्यांच्या सर्वधर्म समभावाची भावना दिसून आली. या महत्त्वपूर्ण प्रसंगी त्यांच्यासोबत आसिफ मुल्ला, अजितसिंह घाटगे,प्रमोद कदम, विशाल पाडळकर, संतोष अंबी, बाळू जनवाडे, संजय कांबळे आणि ज्ञानदेव नलवडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दर्ग्याचे मुजावर रियाज मुजावर, दिलावर मुजावर, असलम मुजावर आणि खालीद मुजावर यांनी राजे घाडगे आणि त्यांच्यासोबतच्या इतरांचे स्वागत केले. राजे घाटगे यांच्यासाठी व उपस्थित सर्वासाठी मुजावरांनी दुवा केली, ज्यामुळे या पवित्र भेटीला आणखी महत्त्व प्राप्त झाले.
मोहरमनिमित्त गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा कागलमधील हिंदू-मुस्लिम एकतेचे एक उत्तम उदाहरण आहे. राजे विरेंद्रसिंह घाटगे यांच्या या भेटीमुळे दोन्ही समाजातील बंधुत्व अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. त्यांनी धार्मिक सलोख्याचा आदर्श समाजात सकारात्मक संदेश दिला.