जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांची कागल ग्रामीण रुग्णालयाला भेट!

प्रतिनिधी (कागल): ग्रामीण रुग्णालय कागल इथून रुग्णांना दिली जाणारी रुग्नसेवा सुरू असलेल्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सर्पदंश, विंचू दंश ,रेबीज लस इत्यादी बाबतची स्थिती तसेच रुग्णालयातील साधन सामग्रीची व्यवस्था जाणून घेण्यासाठी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा .सागर कोंडेकर यांची सहकाऱ्यांन समवेत रुग्णालयाला भेट.
भेटी दरम्यान जिल्हाध्यक्ष कोंडेकर यांनी सहाय्यक अधीक्षक श्री. सातवेकर यांच्याशी चर्चा करतेवेळी रुग्णालयातील उपलब्ध औषधे, सर्पदंश, श्वान चावणे, विंचू दंश या वरील उपचारा संदर्भात विचारले असता श्री. सातवेकर यांनी सदर औषधांचा साठा हा पुरेशा प्रमाणात असून तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून दिले जात असल्याचे, तसेच प्रसंगी कमतरता भासलेस रुग्णालयाच्या अधिकारातून खाजगी स्तरावर लस खरेदी करत असल्याचे सांगितले. तथापि सदर रुग्णालयातून रुग्णांना उपचार वेळेत होत नसल्याच्या तक्रारी असल्यास किसान काँग्रेसशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष कोंडेकर यांनी केले आहे. यावेळी उपस्थित राजेंद्र बागल, प्रकाश चव्हाण , प्रशांत निंबाळकर इ. उपस्तिथ होते.