श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ कणेरी यांच्या कडून शेतकऱ्यांसाठी ‘सुवर्णलाभ’ वृक्षारोपण योजना!

कणेरी ता.करवीर (सलीम शेख ) : श्री सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ यांनी करवीर आणि कागल या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अनोखी वृक्षारोपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात विविध प्रकारची फळझाडे उपलब्ध करून दिली जात आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होईलच, पण शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळेल. आतापर्यंत २५०० हून अधिक झाडांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
फक्त २१० रुपयांमध्ये १० प्रकारची फळझाडे!
श्री सिद्धगिरी महासंस्थानकडून करवीर व कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त २५% किमतीमध्ये म्हणजे २१० रुपयांमध्ये दहा प्रकारच्या फळझाडांचे वाटप केले जात आहे. यामध्ये आंबा (केशर), पेरू (तैवान पिंक), सिताफळ (गोल्डन), जांभूळ, आवळा, लिंबू, शेवगा, चिंच आणि हादगा यांसारख्या झाडांचा समावेश आहे. पुढील दोन दिवस दिनांक २९ व ३० जुलै २०२५ रोजी, मंगळवार व बुधवार, सकाळी १०:३० ते दुपारी ४:००, सिद्धगिरी रोपवाटिका, म्युझियम समोर, कणेरी मठ आणखी कागल व करवीर तालुका साठी झाडे वाटप करण्यात येणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स,सातबारा ही घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले.
ह्या वेळी काही महत्त्वाच्या सूचना शेतकऱ्यांसाठी देण्यात आल्या. जो शेतकरी अगोदर येईल, त्याला प्राधान्य दिले जाईल.झाडे घेऊन गेल्यानंतर ती लावणे आणि जगवणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असेल. झाडे लावल्यानंतर प्रत्येक झाडाची नोंद मठाकडून घेतली जाईल.प्रत्येक प्रकारातील फक्त एकच झाड दिले जाईल.जर तुम्ही दुचाकीवरून झाडे घेऊन जाणार असाल, तर खताच्या दोन रिकाम्या पिशव्या सोबत आणाव्यात. यामुळे एका पिशवीत पाच झाडे ठेवून दोन्हीकडे दोन पिशव्या बांधणे सोपे होईल.ही झाडे “गीव्ह मी ट्रीज, दिल्ली” ( Give Me Trees, Delhi) या संस्थेने दिलेली आहेत.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.अधिक माहितीसाठी संपर्क पांडुरंग काळे: ७३५०८४४१०१,सुधाकर लंबे: ७३८७२०४३२०यांना करावे असे आवाहन करण्यात आले आहे.