विद्यार्थ्यानी शिक्षणक्षेत्रात गरुड झेप घ्यावी- तुषार भास्कर आपुलकी सेवाभावी संस्थेमार्फत शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप!

पत्रकार:(सुभाष भोसले): आपुलकी सेवाभावी संस्थे मार्फत श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजमध्ये अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणेत आले यावेळी अध्यक्ष तुषार भास्कर यांनी सांगितले की अनाथ व गोरगरिब मुला मुलींना चांगले शिक्षण घेवून समाजात चांगले स्थान निर्माण व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपुलकी सेवा भावी संस्था कार्य करीत आहे . विद्यार्थ्यांनी आयुष्यात परिस्थितीवर मात करून उच्य ध्येय बाळगून जिवनात गरुडझेप घ्यावी असे आवाहन त्यांनी केले . यावेळी माजी प्राचार्य शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज श्री बी वाय चंदनशिवे , श्री विजय धामण्णा माजी मुख्याध्यापक सुळकूड हायस्कूल, सौ वर्षा पाटील ,इम्रान खलीफ, सुशांत स्वामी, उपाध्यक्ष सत्यजीत इंगवले, अरविंद कांबळे श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेजचे प्राचार्य टी ए पोवार, उपमुख्याध्यापक आर एस पाटील, पर्यवेक्षिका सौ यु सी पाखरे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शेडबाळे तर आभार कादर जमादार यांनी मानले .