महाराष्ट्र ग्रामीण

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन: राजू शेट्टींसह ४०० जणांवर गुन्हे दाखल!

कोल्हापूर (सलीम शेख ) : शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजू शेट्टी यांच्यासोबतच माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे नेते विजय देवरे यांचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून महामार्ग अडवला होता. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंदोलकांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी एकत्र येत हा महामार्ग अडवला होता. या आंदोलनानंतरच त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button