कोल्हापुरात आषाढी एकादशीनिमित्त ५०० किलो साबुदाणा खिचडी वाटप; आरोग्य शिबिराचेही आयोजन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाने ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या संकल्पनेतून भव्य उपक्रम राबवला. या अंतर्गत सुमारे ५०० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या भक्तिमय वातावरणात शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
या समाजकार्याच्या जोडीला, मनीषा खोत मॅडम यांच्या मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या दुहेरी समाजोपयोगी उपक्रमाला शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेशभाई परमार, दत्ताजी फराकटे, संदीप पाटील, योगेश रेळेकर, शिवम परमार, बिरू फराकटे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनजीत माने, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रतिज्ञा उत्तरे, स्मिता सावंत, रिमा देशपांडे, तालुकाप्रमुख विनोद खोत, शांताराम पाटील, सरदारजी तिप्पे यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे आषाढी एकादशीचा सण भक्ती आणि समाजसेवेच्या समन्वयाने साजरा झाला.