महाराष्ट्र ग्रामीण
कलानगरीची कविता’ संग्रहाचे प्रकाशन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते संपन्न!

कोल्हापूर (सलीम शेख ) : ‘कलानगरीची कविता’ या कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. नंदकुमार मोरे, प्रसाद पाटील, चंद्रकांत पाटील, संपादक एकनाथ पाटील, गोविंद पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याला काव्यप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
नव्या पिढीतील कवींना व्यासपीठ मिळवून देणारा हा संग्रह कोल्हापूरच्या साहित्य वर्तुळात महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.