करवीर तहसीलदारांच्या बदलीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : करवीरचे तहसीलदार यांच्या “चुकीच्या कामकाजामुळे नागरिकांना फटका बसत असल्याचा” आरोप करत, जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नागरिकांच्या हितासाठी संबंधित तहसीलदारांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संस्थेने दिलेल्या निवेदनात, तहसीलदारांच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले आहे. नागरिकांची कामे वेळेत होत नसून, यामुळे प्रशासकीय कामांमध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
या आंदोलनात युवराज पाटील, मोहन पाटील, नामदेव नलवडे, चंद्रशेखर मस्के, संजय सावंत, दिनकर जाधव, यशवंत धोरावत, बाजीराव नाईक यांच्यासह जनविकास स्वाभिमानी सेवाभावी संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.