नवराष्ट्र गव्हर्नन्स अवॉर्ड २०२५” सन्मान सोहळा: मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचा गौरव!

कोल्हापूर (सलीम शेख ) : पुणे येथील हॉटेल तारवडे क्लार्क्स इन्, शिरोळे रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित “नवराष्ट्र गव्हर्नन्स अवॉर्ड २०२५” सन्मान सोहळ्यात कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय रवींद्र पाटणकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. नवभारत समूहाच्या मराठी दैनिक नवराष्ट्रतर्फे आयोजित या सोहळ्यात पाटणकर यांनी नगरपालिका क्षेत्रात दिलेल्या योगदानाला गौरवण्यात आले.
नवराष्ट्र दैनिकाचे महाव्यवस्थापक, पश्चिम महाराष्ट्र, राजेश वरळेकर यांनी या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, नगरपालिका क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या मेहनतीला ऊर्जा देण्यासाठी दैनिक नवराष्ट्रचा हा एक प्रयत्न आहे. पाटणकर यांच्या कार्यामुळे नगरपालिका क्षेत्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली गेली आहे, असेही वरळेकर यांनी नमूद केले.
याप्रसंगी बोलताना, पाटणकर यांनी नवराष्ट्र समूहाचे आभार मानले आणि हा पुरस्कार आपल्याला पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देईल अशी भावना व्यक्त केली. या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि नगरपालिका क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. नवराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हा आवृत्तीप्रमुख दीपक घाटगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.