आमदार अमल महाडिक यांची जवाहरनगर येथील बुद्ध गार्डनला भेट, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

कोल्हापूर (सलीम शेख ) : आमदार अमल महाडिक यांनी आज कोल्हापूर येथील जवाहरनगर, बुद्ध गार्डन येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शक्ती केंद्रप्रमुख नाजीम आतार यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान अल्पसंख्यांक अध्यक्ष आझम जमादार यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार महाडिक यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नागरिकांच्या समस्यांवर योग्य उपाययोजना राबविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, शासनाच्या विविध योजना आणि सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही महाडिक यांनी यावेळी सांगितले. या भेटीमुळे स्थानिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाली असून, त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.