कोल्हापुरात दिव्यांग बांधवांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार, साखर वाटप करून वाढदिवस साजरा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्हा दिव्यांग शिवसेना संघटना यांच्या वतीने दसरा चौक येथे दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये दरमहा १००० रुपयांची वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी साखर पेढे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आनंद साजरा केला. सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी देशातील पहिले मंत्रालय स्थापन करून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
या आनंद सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दिव्यांग शिवसेना राजाराम मेथे , अनिल अदाते , राजू भोईटे , रोहन नरके , उमेश घाटगे, सुर्यकांत मोरे , संजयसिंह जाधव, रुबिन लोखंडे, अमोल पाटील यांच्यासह इतर दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेन्शन वाढीमुळे दिव्यांगांच्या जीवनात मोठा दिलासा मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.