करवीर नगरीत शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नव्या अध्यायाला सुरुवात!

कोल्हापूर (सलीम शेख ) : करवीर नगरीत आज शिवसेना उपनेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नव्याने उभारलेल्या शिवसेना कार्यालयाचे थाटामाटात उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याने कोल्हापुरात शिवसेनेच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.
यावेळी बोलताना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आणि शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची धोरणे व कार्य अधिक व्यापक होण्यासाठी हे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कामी येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, आमदार सुजित मिणचेकर, श्रीमती जयश्रीताई जाधव, नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या करवीर नगरीत या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. हे कार्यालय पक्ष वाढीसाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल.