सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालयात कै. एस.के. पाटील स्मृती जागर कार्यक्रम संपन्न!

कुरुंदवाड (शिरोळ): सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे कै. एस.के. पाटील स्मृती जागर कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विजय जयराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी खास करून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. सुशांत संजय पाटील उपस्थित होते. अॅड. सुशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी कशाप्रकारे योगदान द्यावे आणि भविष्यासाठी तयारी करावी, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली आणि महाविद्यालयाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते