महाराष्ट्र ग्रामीण
स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूडमध्ये शालेय साहित्य व खाऊ वाटप सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन!

मुरगूड (सलीम शेख ) : येथील सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनने शाहू साखर कारखान्याचे संस्थापक, स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवला. याप्रसंगी लहान मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या समाजसेवा आणि आदर्श कार्याला आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुरगूड आणि आसपासच्या परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मदत करणे हा होता. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून त्यांना शिक्षणाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.