महाराष्ट्र ग्रामीण
नांदणी येथे विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

नांदणी ता. (सलीम शेख) : शिरोळ एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील एका विहिरीत ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. बाळाबाई विलास पोळ (रा. नांदणी) असे मृत महिलेचे नाव आहे.
ही घटना सकाळी निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तात्काळ शिरोळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शिरोळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. समर्पण संस्थेचे स्वप्नील नरूटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.
सध्या शिरोळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे नांदणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.