महाराष्ट्र ग्रामीण
निगवे दुमाला ग्रामपंचायतीत दिव्यांगांना गरजेनुसार साधनांचे वाटप!

निगवे दुमाला (सलीम शेख) : निगवे दुमाला ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील दिव्यांग बांधवांसाठी सहाय्यभूत साधनांचे वाटप केले. या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होणार असून, त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त करत ग्रामपंचायत आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
मिळालेल्या साधनांचा उपयोग करून आपले जीवन अधिक सुखमय होईल, अशी भावना यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली. या प्रसंगी सरपंच दिपाली चौगुले, उपसरपंच अश्विनी कांबळे, ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे, दिव्यांग सेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष उत्तम चौगुले, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मदत वाटपामुळे दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन व्यवहार करणे अधिक सोपे होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे