नंदवाळ कोल्हापूर येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे आषाढी दिंडीतील वारकऱ्यांची सेवा!

नंदवाळ: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणि वस्ताद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त नंदवाळ कडे पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकरी भाविकांना केळी आणि पाण्याची बाटली वाटप करण्यात आली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्र अध्यक्ष श्री. दत्ता पाटील (वस्ताद), तसेच प्रमुख पदाधिकारी रणजीत उर्फ अण्णा मोरे, शहाजी गायकवाड, विशाल पाटील, राहुल बोडके आणि सुनील तोरस्कर हे विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांनी स्वतः वारकऱ्यांना फळे आणि पाणी वाटप करून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.
आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक नंदवाळ कडे पायी दिंडीने जातात. या प्रवासात त्यांना पाण्याची आणि फळांची विशेष गरज असते. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने ही गरज ओळखून वारकऱ्यांसाठी ही सेवाभावी मोहीम राबवली. त्यांच्या या कार्याचे दिंडीतील भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी कौतुक