कारगिल विजय दिवस: पाचगाव येथे सैनिक कुटुंबीयांचा सत्कार समारंभ!

पाचगाव (सलीम शेख ) : कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून पाचगाव येथील गजानन सिद्धी मल्टिप्लेक्स हॉलमध्ये सैनिक सेवा संस्थेच्या वतीने सैनिक कुटुंबीयांशी संवाद आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमल महाडिक उपस्थित होते.
यावेळी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सर्व वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. आमदार अमल महाडिक यांनी आपल्या देशाच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक विलास वास्कर, संजय वास्कर, रावसाहेब नाटकुळे, समीर खानोलकर, गजानन चव्हाण, श्रीकांत मगदूम, अशोक माळी, विजय भोसले, भगवान पाटील, प्रताप मगदूम, मारुती पोवार, सुजाता पाटील, कविता चव्हाण यांच्यासह अनेक माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सैनिक सेवा संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे सैनिक कुटुंबीयांना सन्मान मिळाल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.