महाराष्ट्र ग्रामीण
पट्टणकोडोलीच्या प्रशासकपदी ए. एस. कटारे यांची नियुक्ती!

पट्टणकोडोली ( सलीम शेख ): येथील प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या जागेवर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. एस. कटारे यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभारी सरपंच अमोल बाणदार यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव ३० जून रोजी १२ विरुद्ध ०१ मताने मंजूर झाला. पट्टणकोडोली ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच सरपंचपद अपात्र ठरले होते. त्यानंतर उपसरपंच यांच्याकडे प्रभारी पदभार असताना त्यांच्यावरही अविश्वास ठराव दाखल झाल्याने ते पदही रिक्त झाले. यामुळे गावाचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक बनली होती. या पार्श्वभूमीवर, ए. एस. कटारे यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे